पोस्ट्स

कळसुबाई

इमेज
महाराष्ट्राचे माऊंट एवरेस्ट. कळसुबाई शिखर 5400 फूट आणि 8 वर्ष वयाच्या श्रीवर्धन ची यशस्वी चढाई.🚩🚩                   रात्रीच्या गडद अंधारात साधारण 8-10*c च्या गारव्यात बारी गावच्या पायथ्यापासून साधारण रात्री 3 च्या सुमारास श्रीवर्धन ने आव्हानात्मक असलेल्या कळसुबाई शिखराच्या चढाईची सुरुवात केली. भाताची शेतवड पार पाडत मोठमोठ्या दगडानी भरलेल्या बिकट चढाईच्या वाटेची सुरुवात झाली. टॉर्चच्या उजेडातच पूर्ण ट्रेक पार करायचा होता. त्यात धुक्याचे लोट गारठा वाढवत होते. श्री ची वाटचाल न थांबता चालूच होती. बऱ्याच ठिकाणी अडखळत, ठेचकळत होता पण त्याला कोणाचाही आधार नको होता. मी स्वतः चढाई करणार हे त्याचे मत आणि ते शेवटपर्यंत त्याने पाळले याचे मला विशेष कौतुक वाटत होते. तासाभराच्या चढाईंनंतर चा उभ्या शिडीचा अवघड टप्पा त्याने सावधपणे पार पाडला. लोखंडी शिड्या धुक्यामुळे ओलसर झाल्या होत्या आणि त्यात खाली खोल दरी होती. एव्हाना 4 वाजून गेले होते. इथून पुढे उभा चढ पार करायचा होता. पहाटेच्या गारव्यात सुद्धा चढताना दम लागत होता. त्याने 5-10 मिनिट उस...